मोर्णा चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 03:28 PM2018-12-30T15:28:06+5:302018-12-30T15:28:12+5:30

अकोला: स्थानिक लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे मोर्णा महोत्सवांतर्गत शनिवार सकाळी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अकोल्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रतिसाद दिला.

Students respond to the Morna painting competition | मोर्णा चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

मोर्णा चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

Next

अकोला: स्थानिक लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे मोर्णा महोत्सवांतर्गत शनिवार सकाळी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अकोल्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रतिसाद दिला. अकोला जिल्हा कलाध्यापक संघ, यांच्याद्वारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
‘मोर्णा स्वच्छता अभियान’ या विषयावर तीन गटात ही स्पर्धा होती. यासाठी अकोला जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष संजय आगाशे, सचिव दिनेश पाटील, विभागीय उपाध्यक्ष सुभाष धार्मिक, तसेच स्पर्धा प्रमुख उमेश जोशी, चंद्रकांत वाघ आणि अमर देशमुख तसेच कलाध्यापक संघाचे गोपाल देशमुख, रवी मुळे, नरेंद्र्र मायी, मुकेश गव्हाणकर, निशांत दलाल, सुनील बोचरे, राजू वाटमारे, सतीश देशमुख, राहुल राठोड, अरविंद मानकर, संतोष सहारे, संदीप शेवलकर, गणेश खानझोडे, राजेश सातव, सुनील देशमुख, अविनाश नळकांडे यांच्यासह विविध शाळांतील शिक्षक, कलाशिक्षकांनी प्रयत्न घेतले.
हे आहेत विजेते

  • ‘अ’ गटातून राजेश्वर कॉन्व्हेंटचा अथर्व कवडे हा प्रथम; भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाचा अमेय शेगावकर द्वितीय, तर प्रभात किड्स स्कूलची प्रांजली चंदन तृतीय आली.
  • ‘ब’ गटातून होलीक्रॉसची प्रचिती कुलट प्रथम आली; खंडेलवाल इंग्लिश स्कूलचा लक्ष्मीकांत ठोसर द्वितीय तर प्राजक्ता कन्या विद्यालयाची दिव्या लाड तृतीय आली.
  • ‘क’ या खुल्या गटातून बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयाचा विशाल वानखडे प्रथम आला; प्रतीक वाघ द्वितीय, तर हेमंत उपरिकर तृतीय आला.

 

Web Title: Students respond to the Morna painting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.