विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:15 AM2020-12-26T04:15:23+5:302020-12-26T04:15:23+5:30

विशेष घटक योजनेतून वीजजोडणी करावी अकाेला : परिसरातील अनेक गावांमधील तसेच काही वॉर्डांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झाला नाही. या ...

Students should not be deprived of scholarship scheme | विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये

विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये

Next

विशेष घटक योजनेतून वीजजोडणी करावी

अकाेला : परिसरातील अनेक गावांमधील तसेच काही वॉर्डांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झाला नाही. या वॉर्डांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीजजोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांनी विशेष घटक योजनेअंतर्गत वीजपुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे केली आहे.

वराहांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त

अकाेला : परिसरातील गावांत मोकाट श्वानांचा हैदोस वाढला आहे. तुकाराम चाैक, नेहरू पार्क तसेच अशाेक वाटिका चाैकात रात्री मोकाट श्वानांचा मुक्त वावर दिसतो. अनेक वाहनधारकांच्या मागे हे श्वान लागत असल्याने दुचाकीस्वार त्रस्त आहे. घरासमोर लाल पाण्याच्या बाॅटल ठेवून काही नागरिकांनी बंदोबस्त केला होता.

घाटोळे पाटील समाजाला मिळणार वास्तू

अकाेला : मराठा घाटोळे पाटील समाज विकास मंडळाच्या माध्यमातून खडकीतील जि. प. नगर परिसरात मराठा घाटोळे पाटील समाजाच्या मंगल भवन व वसतिगृहाची वास्तू लवकरच निर्माण अवस्थेत पोहोचणार आहे. साकारण्यात येत असणाऱ्या या भव्य वास्तूचा फलक अनावरण सोहळा नियोजित जागेवर रविवारी मोठ्या झाला. ज्येष्ठ समाजसेवी पांडुरंग गाडवे यांच्या अध्यक्षतेत संपन्न या फलक अनावरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भूषण मापारी, डॉ. राम शिंदे, मधुकरराव ठोकळ, भाऊसाहेब कपले, साहेबराव भांगे, ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष अशोकराव कोहर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नियोजित वास्तूस आर्थिक साहाय्य करणारे माजी आ. विजयराव जाधव,गणेशराव शिंदे, प्रशांतराव बोथे, पुणे येथील गुणवंतराव गहुले आदींचा शाल, श्रीफळ प्रदान करून गौरव करण्यात आला. समाज विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव नानोटे, कार्याध्यक्ष सहदेवराव शिंदे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कपले, भाऊसाहेब काळे, नारायणराव बारड, सचिव दिलीपराव बोबडे, सहसचिव श्रावणजी फाले, कोषाध्यक्ष सुरेश गाडवे, संघटन सचिव रावसाहेब राहणे, शरद दहातोंडे, डॉ. जगदेवराव मार्गे, डॉ. विजय लकडे, रुपेश लडे, अरविंद कपले, गणेशराव नानोटे, सतीश पाटील, पीयूष चव्हाण, हरिचंद्र डांगे, डॉ. दयानंद पावसे, महेंद्र गाडवे, मनीषराव सरोदे आदींच्या कार्यकाळात ही वास्तू साकारत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रास्ताविक नारायणराव बारड यांनी संचालन रावसाहेब राहणे यांनी तर आभार डॉ. दयानंद पानसे यांनी मानले.

Web Title: Students should not be deprived of scholarship scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.