जिल्हास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे - शिक्षणाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:57 AM2021-01-08T04:57:54+5:302021-01-08T04:57:54+5:30

पातूर: विदर्भ कला शिक्षक संघ, जिल्हा शाखा, अकोलातर्फे जिल्हास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. काेराेना प्रादुर्भावापासून सुरक्षित राहून ...

Students should participate in district level online drawing competition - Education Officer | जिल्हास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे - शिक्षणाधिकारी

जिल्हास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे - शिक्षणाधिकारी

googlenewsNext

पातूर: विदर्भ कला शिक्षक संघ, जिल्हा शाखा, अकोलातर्फे जिल्हास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. काेराेना प्रादुर्भावापासून सुरक्षित राहून भीती मुक्त व आनंदी जीवन जगणे या उद्दिष्टाने स्पर्धा आयोजित केली आहे. सद्यस्थितीच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या निशुल्क स्पर्धेत सहभागी होण्याकरिता मुख्याध्यापकांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले.

स्पर्धा निशुल्क राहील. प्रत्येक गटातून सर्वोत्कृष्ट असे ३० जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. चित्र काढण्यासाठी ११बाय १५ इंच आकाराचा कागद वापरावा. रंग माध्यमांचे बंधन नाही. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे फोटो आपल्या शाळेच्या कलाशिक्षक किंवा कला विषय संबंधित शिक्षकांना पाठवावा. कलाशिक्षक मिळालेल्या चित्र व त्यांची यादी मुख्याध्यापक यांच्या सहीसह संघटनेकडे पाठवतील. विद्यार्थ्यांनी शाळेच्या माध्यमाने सहभाग घ्यावा. चित्राच्या समोरच्या बाजूला नाव, मोबाईल नंबर, वर्ग, गट क्रमांक इत्यादी आवश्यक तपशील सुस्पष्ट अक्षरात लिहिलेला असावा. अंतिम तारीख २० जानेवारी २०२१ असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आशिष चौथे ,प्रमोद गीते, राजेश्वर बुंदेले व स्पर्धा प्रमुख संदीप शेवलकार उपस्थित होते.

Web Title: Students should participate in district level online drawing competition - Education Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.