विद्यार्थ्यांनी रोखली नागपूर-भूसावल पॅसेंजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 03:45 PM2018-07-10T15:45:09+5:302018-07-10T15:47:31+5:30

रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाच्या निषेध करीत परिसरातील विद्यार्थ्यांनी मंगळवार, १० जुलै रोजी नागपूर-भूसावल पॅसेंजर गाडी रोखली.

Students stopped Nagpur-Bhusaval passenger | विद्यार्थ्यांनी रोखली नागपूर-भूसावल पॅसेंजर

विद्यार्थ्यांनी रोखली नागपूर-भूसावल पॅसेंजर

Next
ठळक मुद्देप्रवाशी संख्या व उत्पन्न कमी असल्याच्या कारणावरून हे रेल्वे स्थानक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. स्टेशन परिसरात चार पाच छोटी खेडी असून येथील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथे येतात. सोमवापासून या स्थानकावर पॅसेंजर गाडी थांबली नाही.



मूर्तिजापूर (जि. अकोला): मध्य रेल्वेच्या अकोला व मूर्तीजापूर या दोन मोठ्या स्थानकांदरम्यान असलेले मूर्तीजापूर तालुक्यातील मंडूरा हे छोटे रेल्वेस्थानक बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाच्या निषेध करीत परिसरातील विद्यार्थ्यांनी मंगळवार, १० जुलै रोजी नागपूर-भूसावल पॅसेंजर गाडी रोखली. अर्ध्या तासानंतर रेल्वे अकोलाकडे रवाना झाली.
तालुक्यातील मंडूरा हे सर्वात छोटे रेल्वे स्टेशन असून, प्रवाशी संख्या व उत्पन्न कमी असल्याच्या कारणावरून हे रेल्वे स्थानक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. माना व कुरुम या दोन स्थानकांदरम्यान मंडूरा हे रेल्वेस्थानक आहे. या स्टेशन परिसरात चार पाच छोटी खेडी असून येथील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथे येतात. मूर्तीजापूर किंवा अकोला या दोन शहरांकडे जाण्यासाठी पॅसेंजर गाडी हाच एकमेव पर्याय आहे. हे रेल्वे स्थानक ब्रिटिश कालीन असून, मध्यंतरीच्या काळात बंद करण्यात आले होते; परंतु तत्कालीन मंत्री गुलामनबी आझाद यांनी या रेल्वे स्थानकाचे रितसर उद्घ्द्घटन करुन अडगळीत पडलेले स्टेशन पुन्हा सुरू केले होते. प्रवासी संख्या व उत्पन्न कमी असल्याचे कारण पुढे करत रेल्वे प्रशासनाने हे स्थानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवापासून या स्थानकावर पॅसेंजर गाडी थांबली नाही. त्यामुळे विद्यार्थी व येणाऱ्या-जाणाºयांची अडचण होत आहे. या स्थानकावर पॅसेंजर गाडीचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी १० वाजता नागपूर-भूसावल पॅसेंजर रोखून धरली. सुमारे अर्धातास हा प्रकार सुरुच होता. यावेळी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. त्यानंतर ही गाडी पुढील प्रवासाकरीता रवाना करण्यात आली.

Web Title: Students stopped Nagpur-Bhusaval passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.