विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:22 AM2017-10-16T02:22:55+5:302017-10-16T02:23:31+5:30
शासनाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकांनी संकल्प घ्यावा, असा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार जिल्हय़ातील ४४५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली आणि आवाजी फटाक्यांची आतषबाजी न करण्याचा निर्धार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शासनाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकांनी संकल्प घ्यावा, असा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार जिल्हय़ातील ४४५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली आणि आवाजी फटाक्यांची आतषबाजी न करण्याचा निर्धार केला.
शासनाने शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वच शाळांमधील प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प घ्यावा, असा आदेश दिला होता.
दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. या आतषबाजीमुळे पर्यावरणासह ध्वनिप्रदूषण मोठय़ा प्रमाणात होते. यासोबतच ध्वनी व हवेच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन, कर्णबधिरता, श्वसनाचे, फुप्फुसाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे ध्वनी व हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हय़ातील प्राथमिक व माध्यमिक ४४५ शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त करण्याची शपथ घेतली आणि दिवाळीमध्ये मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांची आतषबाजी करणार नाही, असा निर्धार केला. शासनाने दिलेल्या शपथपत्राचे शाळांमध्ये सामुहिक वाचन करून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. अकोला तालु क्यातील काही शाळांना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी दिनेश दुतंडे यांच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी भेटी दिल्या.