दानापूर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:19 AM2021-04-02T04:19:00+5:302021-04-02T04:19:00+5:30

मनोज नाशिक येथे १५ महिन्यांपासून प्रशिक्षण घेत होते. नुकतीच महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे मनोज राऊत यांच्यासह ...

Sub-Inspector of Police became the son of a smallholder farmer in Danapur | दानापूर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक

दानापूर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक

Next

मनोज नाशिक येथे १५ महिन्यांपासून प्रशिक्षण घेत होते. नुकतीच महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे मनोज राऊत यांच्यासह ६६८ प्रशिक्षणार्थ्यांनी शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ऑनलाइन उपस्थित होते.

माझी नेमणूक नागपूर येथे झाल्याचे यावेळी मनोज यांनी सांगितले.

मनोज यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कैतुक होत आहे.

कोट :

मी गेल्या दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. माझी परिस्थिती हलाखीची असल्याने मला खूप अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, मी खचून न जाता पुढे गेलो. जिद्दीच्या भरवशावर मी पोलीस विभागात आज पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्त झालो. मी माझ्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देतो.

....

त्रिदल सैनिक युनियन विदर्भ यांची

दानापूर येथे जामोदकार परिवारास भेट

दानापूर : हिवरखेड पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या ग्राम दानापूर येथे दि.९/३/२०२१ रोजी फौजी पतीच्या गैरहजेरीत पत्नी व मुलाला दारुड्याने लोखंडी पाइपने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्या अनुषंगाने सैनिकाच्या जखमी झालेल्या परिवाराला पाहण्याकरिता व त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी त्रिदल सैनिक युनियन, अकोला यांनी भेट दिली. त्यावेळी शिवदास जामोदकार व परिवाराने समस्या मांडली की, सैनिकांवर असा अन्याय होत असेल, तर त्यांनी सीमेवर ड्यूटी कशी करावी? सैनिकांवर व त्यांच्या परिवारावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर कारवाई करून मदत करावी? अशी बाजू मांडण्यात आली. यावेळी त्रिदल सैनिक युनियनचे विदर्भप्रमुख संतोष भाऊ चराटे, जिल्हा अध्यक्ष देवीदास कासगे, उपाध्यक्ष शंकरभाऊ पातोंड, बार्शिटाकळी, उपाध्यक्ष श्रीकृष्ण आखरे, सचिव रवींद्र शित्रे व ग्रा.पं. उपसरपंच सागर ढगे, तसेच पत्रकार मित्र उपस्थित होते.

Web Title: Sub-Inspector of Police became the son of a smallholder farmer in Danapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.