अपूर्ण रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या प्रदूषण स्थितीचा अहवाल सादर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:15 AM2021-06-04T04:15:45+5:302021-06-04T04:15:45+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली निर्माणाधीन रस्त्यांच्या कामांच्या सद्य:स्थितीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आ. नितीन देशमुख, ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली निर्माणाधीन रस्त्यांच्या कामांच्या सद्य:स्थितीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जागतिक बँक प्रकल्प इत्यादी विविध संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याबाबत आढावा घेण्यात आला. रहदारीला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही, या पद्धतीने व्यवस्था करावी, पावसाळ्यात नागरिकांचे हाल होऊ देऊ नका, अपूर्ण कामे कधीपर्यंत पूर्ण होतील, याबाबत कालमर्यादेसह अहवाल सादर करा आणि त्या कालमर्यादेचे पालन न करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कारवाई करा, असे निर्देश कडू यांनी दिले. रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, रस्त्याची कामे अपूर्ण असल्याने त्याचा वातावरणावरील प्रदूषणाचा परिणाम तपासण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून येत्या १५ दिवसांत अहवाल मागवा, असे निर्देशही कडू यांनी दिले.