वृक्ष लागवडीसाठी खड्डय़ांचा अहवाल सादर करा!
By admin | Published: June 16, 2016 02:18 AM2016-06-16T02:18:58+5:302016-06-16T02:18:58+5:30
अकोला जिल्हाधिका-यांचे निर्देश : कुचराई केल्यास प्रशासकीय कारवाई.
अकोला: वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ांचा अहवाल शनिवार, १८ जून सायंकाळपर्यंंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिले. वृक्ष लागवडीच्या कामात कुचराई करणारांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावर्षीच्या पावसाळ्यात वन महोत्सवाच्या कालावधीत १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट शासनामार्फत ठरविण्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यात २ लाख ३0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे; परंतु वृक्ष लागवडीसाठी शनिवार, ११ जूनपर्यंंत १ लाख ५0 हजार खड्डे खोदण्यात आले असून, उर्वरित ह्य७२ हजारांवर खड्डे खोदण्याचे काम रेंगाळलेह्ण या आशयाचे वृत्त १२ जून रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले. संबंधित वृत्ताची दखल घेत, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी जिल्हास्तरावर विविध विभागप्रमुख आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांची बैठक घेतली. वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ांच्या कामाचा आढावा विभागनिहाय जिल्हाधिकार्यांनी घेतला. वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ांचा अहवाल १८ जून रोजी सायंकाळपर्यंंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी संबंधित अधिकार्यांना यावेळी दिले. जिल्ह्यात २ लाख ३0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असले तरी १ जुलै रोजी सर्व शासकीय कार्यालयांना ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड करावयाची असून, त्यांचे संगोपन करावयाचे आहे, असे सांगत वृक्ष लागवडीच्या कामात कुचराई केल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिला. या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विजय माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे यांच्यासह विविध विभागप्रमुख आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.