जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसह वीज पुरवठ्याच्या कामांचे प्रस्ताव सादर करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:19 AM2021-07-27T04:19:47+5:302021-07-27T04:19:47+5:30
अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. ...
अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील विविध भागात रस्ते खराब झाले असून, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. त्या अनुषंगाने जिल्ह्यात तातडीने करावयाच्या रस्ते दुरुस्तीसह वीज पुरवठ्याच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून, संंबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव खर्चाच्या अंदाजपत्रकासह मंगळवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ. अ. गणोरकर, महावितरणचे पवनकुमार कछोट, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मजिप्राचे एन.एम राठोड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए. ए. खान, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच जिल्हयातील तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
संपर्क तुटलेल्या गावांतील कामे प्राधान्याने हाती घ्या!
जिल्ह्यातील तालुकानिहाय नुकसानीचा आढावा यावेळी घेण्यात आला. दुरुस्ती कामांच्या प्रस्तावात अत्यंत आवश्यक असलेल्या कामांचा समावेश करुन, जिथे गावांचा संपर्क तुटला आहे तेथील कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वीजपुरवठा सुरळीत करुन, राष्ट्रीय महामार्गालगत नुकसान संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडून दुरुस्तीची कामे करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
दळणवळण सुरु करण्यासाठी डागडुजी, दुरुस्तीची कामे करा!
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागात तातडीने दळणवळण सुरु करता यावे ,यासाठी आवश्यक ती डागडुजी व दुरुस्तीची कामे सुरु करुन, करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी ठरवावा. तसेच जी कामे अन्य विभागांच्या निधीतून होतील किंवा अन्य योजनांमधून होऊ शकतील, त्या कामांचा समावेश या तातडीच्या कामांमध्ये करु नये,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
फोटो: