पेयजल योजनेची चौकशी करून अहवाल सादर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:25 AM2017-09-25T01:25:40+5:302017-09-25T01:25:52+5:30

तेल्हारा : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील खेलदेश पांडे येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठय़ाच्या अपूर्ण कामाच्या  तक्रारीची दखल विधान मंडळ पंचायतराज समितीने घे तल्याने सदर कामाची चौकशी करून तातडीने चौकशी  करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी  अकोट येथील उपविभागीय अभियंत्यांना दिला आहे.

Submit report by drinking water scheme inquiry! | पेयजल योजनेची चौकशी करून अहवाल सादर करा!

पेयजल योजनेची चौकशी करून अहवाल सादर करा!

Next
ठळक मुद्देतक्रारीची पंचायत राजकडून दखल कार्यकारी अभियंत्याचा उपविभागीय अभियंत्याला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील खेलदेश पांडे येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठय़ाच्या अपूर्ण कामाच्या  तक्रारीची दखल विधान मंडळ पंचायतराज समितीने घे तल्याने सदर कामाची चौकशी करून तातडीने चौकशी  करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी  अकोट येथील उपविभागीय अभियंत्यांना दिला आहे.
तेल्हारा तालुक्यातील खेलदेशपांडे येथे राष्ट्रीय पेयजल  योजनेंतर्गत बोअरवेल खोदणे, स्वीचरूम बांधणे, पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन टाकणे व एक लाख लीटर क्षम तेची पाण्याची टाकी बांधणे या कामांना सन २0१२ मध्ये  मंजुरी देण्यात आली होती. सदर कामाद्वारे गावात असणारी  पाणीटंचाई दूर व्हावी, याकरिता ६0 लाख रुपयांचा  निधीदेखील मंजूर करण्यात आला होता. 
सदर कामाचा ठेका अमरावती येथील ठेकेदारास देण्यात  आला होता. त्या कामाचे भूमिपूजन  तत्कालीन चौथ्या वित्त  आयोगाचे राज्याचे अध्यक्ष जे. पी. डांगे व तत्कालीन  विभागीय आयुक्त बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले होते.  अशा स्थितीत कामे मंजूर व निधी उपलब्ध असतानादेखील  पाच वर्षांचा कालावधी उलटूनदेखील सदर काम अद्यापही  अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा  लागतो. मागे तालुक्याच्या दौर्‍यावर आलेल्या विधान मंडळ  पंचायतराज समितीकडे याबाबत खेलदेशपांडे (उबारखेड)  येथील नगरिक प्रफुल्ल भीमराव मोटे यांनी लेखी स्वरूपात  तक्रार सादर केली होती. 
सदर तक्रारीची पंचायतराज समितीने गांभीर्याने दखल घेऊन  याबाबत सखोल चौकशीचा आदेश दिला असल्याने जिल्हा  परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उ पविभागीय अभियंता अकोट यांना सदर अपूर्ण काम त्वरित  पूर्ण करून झालेल्या कामाची चौकशी करण्याचा व अहवाल  सादर करण्याचा आदेश दिला आहे. 

खेलदेशपांडे येथे अपूर्ण असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे  काम त्वरित पूर्ण करून चौकशी करण्याबाबत आदेश प्राप्त  झाला असून, सदर कामाची चौकशी लवकर करण्यात  येईल.
- किशोर ढवळे,
उपविभागीय अभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, अकोट.

Web Title: Submit report by drinking water scheme inquiry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.