२४ गावातील अवैध बांधकामाच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करा!

By admin | Published: February 13, 2016 02:28 AM2016-02-13T02:28:07+5:302016-02-13T02:28:07+5:30

अकोला तहसीलदारांचे निर्देश: तलाठी, ग्रामसेवकांची घेतली बैठक.

Submit report of illegal construction survey of 24 villages! | २४ गावातील अवैध बांधकामाच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करा!

२४ गावातील अवैध बांधकामाच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करा!

Next

अकोला: शहरानजिकच्या २४ गावांमधील अवैध बांधकामांच्या सर्वेक्षणाचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश, अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांनी शुक्रवारी तलाठी व ग्रामसेवकांच्या बैठकीत दिले. जिल्ह्यातील शहरानजिक १0 किलोमीटर क्षेत्रातील गावांमध्ये विनापरवानगी आणि मंजूर नकाशापेक्षा जास्त करण्यात आलेल्या अवैध बांधकामाबाबत कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण करून, अवैध बांधकामांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना तीन महिन्यांपूर्वी दिला. त्यानुषंगाने २४ गावांमधील अवैध बांधकामांच्या सर्वेक्षणाचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले.

Web Title: Submit report of illegal construction survey of 24 villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.