‘पोषण आहार वाटपाचा चौकशी अहवाल सादर करा!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:32 AM2017-08-23T01:32:09+5:302017-08-23T01:32:27+5:30
अकोला: जिल्हय़ातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार वाटप संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत बुधवारी देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हय़ातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार वाटप संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत बुधवारी देण्यात आले.
शालेय पोषण आहार वाटप योजनेंतर्गत जिल्हय़ातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आहार वाटपासंबंधी गत जुलैमध्ये पाहणी करण्यात आली. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना या सभेत देण्यात आल्या. तसेच जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांना गणवेश आवश्यक करण्यात आला असून, या निर्णयाच्या अंमलबजावणीत शिक्षक गणवेशात कसे येतील, याबाबत काळजी घेण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. मोरझाडी येथील एका शिक्षकास कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती, त्यावर काय कारवाई करण्यात आली याबाबत विचारणा करीत, जिल्हय़ातील जिल्हा परिषद शाळांच्या आवारभिंती आणि जलशुद्धीकरण यंत्राच्या मुद्दय़ावर या सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सदस्य प्रतिभा अवचार, संतोष वाकोडे, अक्षय लहाने, मनोहर हरणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.