पंधरा दिवसांत वान धरणाचा प्रस्ताव सादर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 10:50 AM2020-11-11T10:50:45+5:302020-11-11T10:51:05+5:30

Wan Dam News एक महिन्याच्या आत अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश पाणी पुरवठा मंत्री ना. पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Submit Wan Dam proposal in fortnight! | पंधरा दिवसांत वान धरणाचा प्रस्ताव सादर करा!

पंधरा दिवसांत वान धरणाचा प्रस्ताव सादर करा!

Next

अकाेला: बाळापूर मतदारसंघातील ६९ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेसाठी वान धरणातून जलसाठ्याची उचल केली जाणार आहे. यासंदर्भात येत्या १५ दिवसांत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता चंद्रकांत गजभिये यांना दिले. शिवसेना आ. नितीन देशमुख यांच्या शिफारशीवरून मंगळवारी सदर बैठकीचे पाणी पुरवठा मंत्र्यांच्या दालनात आयाेजन करण्यात आले हाेते.

बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ६९ गावांचा खारपाणपट्ट्यात समावेश हाेताे. या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. सदर ६९ खेडी पाणी पुरवठा याेजनेतील काही गावांचा अकाेला पूर्व विधानसभा मतदारसंघातही समावेश हाेताे. दरम्यान, या गावातील नागरिकांना वान धरणातून मुबलक पाणी पुरवठा हाेऊ शकत असल्याने आ. नितीन देशमुख यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुषंगाने मंगळवारी पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या दालनात मजीप्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी आ. देशमुख यांनी याेजनेला आडकाठी ठरणाऱ्या तांत्रिक मुद्यांवर ना. गुलाबराव पाटील यांच्यासाेबत चर्चा करून तांत्रिक मुद्दे दूर करण्याची विनंती केली. बैठकीत उपस्थित शासनाच्या अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केल्यानंतर सदर याेजनेसंदर्भात पुढील १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश पाणी पुरवठा मंत्री ना. पाटील यांनी दिले. बैठकीमध्ये जि.प.तील शिवसेनेचे गटनेता गाेपाल दातकर, मजीप्राचे मुख्य अभियंता चंद्रकांत गजभिये, कक्ष अधिकारी राम साबने, अधीक्षक अभियंता विवेक साेळंके अकाेला, कार्यकारी अभियंता नीलेश राठेाड, उपअभियंता मिलिंद जाधव आदी उपस्थित हाेते.

 

६४ खेडी याेजनेसाठी दुरुस्तीचा प्रस्ताव

यावेळी आ. नितीन देशमुख यांनी ६४ खेडी खांबाेरा प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेच्या दुरुस्ती प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला. अंदाजपत्रकासाठी आ. देशमुख यांनी ५८ काेटी रुपयांची मागणी केली असता, एक महिन्याच्या आत अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश पाणी पुरवठा मंत्री ना. पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: Submit Wan Dam proposal in fortnight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.