शेतकऱ्यांच्या याद्या जमा करण्याचा मुहूर्त टळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:24 PM2020-02-11T12:24:09+5:302020-02-11T12:24:26+5:30

मदतीच्या रकमेचे धनादेश सोमवारी बँकांमध्ये जमा करण्यात आले नाही.

Submiting farmers' lists avoided | शेतकऱ्यांच्या याद्या जमा करण्याचा मुहूर्त टळला!

शेतकऱ्यांच्या याद्या जमा करण्याचा मुहूर्त टळला!

Next

अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची देण्यासाठी तिसºया टप्प्यात प्राप्त झालेली मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश सोमवारी संबंधित बँकांमध्ये जमा करण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र त्यानुसार शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश सोमवारी बँकांमध्ये जमा करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये सादर करण्याचा मुहूर्त टळला आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाई वाटप करण्याच्या दोन टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत शासनामार्फत १ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम ४ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली असून, मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमार्फत सोमवार, १० फेबु्रवारीपासून सुरू करण्यात येणार होती; परंतु त्यानुसार शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याचा मुहूर्त टळला आहे.

शेतकºयांच्या याद्या आणि धनादेश तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश तातडीने बँकांमध्ये जमा करण्याचे निर्देश जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
- संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: Submiting farmers' lists avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.