कृषी निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना अनुदान; लॉटरी पद्धतीने निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:20 AM2021-05-21T04:20:10+5:302021-05-21T04:20:10+5:30

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मुलद्रव्ये भूसुधारके ...

Subsidies to farmers for agricultural inputs; Lottery selection! | कृषी निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना अनुदान; लॉटरी पद्धतीने निवड!

कृषी निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना अनुदान; लॉटरी पद्धतीने निवड!

Next

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मुलद्रव्ये भूसुधारके व पीक संरक्षण औषधी या निविष्ठांसाठी एक एकराच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकांच्या प्रकारानुसार अनुदान मिळणार आहेत. यासाठी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत आहेत. या पॅकेजचा वापर करणे अनिवार्य असल्याचे कृषी विभागाने सांगितले. सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कापूस व मका पिकांमध्ये मिनी किट कडधान्यांचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे. तर मिनी किटची किंमत अनुदानापेक्षा अधिक असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे.

--बॉक्स--

एका शेतकऱ्याला दोन हेक्टर मर्यादेत लाभ

कडधान्य बियाणांसाठी १० वर्षांआतील वाणाला ५० रुपये प्रतिकिलो, १० वर्षांवरील वाणाला २५ रुपये प्रतिकिलो ज्वारी व बाजरी सरळ वाणाच्या बियाणांकरिता ३० रुपये प्रतिकिलो, १० वर्षांआतील वाणाला ३० रुपये प्रतिकिलो, १० वर्षांवरील वाणाला १५ रुपये प्रतिकिलो, सोयाबीन बियाणांसाठी १० ते १५ वर्षांच्या वाणासाठी १२ रुपये प्रतिकिलो एकूण किमतीच्या एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टर मर्यादेत लाभ देय राहील.

--बॉक्स--

असे आहे बियाणांचे नियोजन

लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना १० वर्षाआतील तूर १७६ क्विंटल, मूग १४१ क्विंटल, उडीद २३ क्विंटल तर १० वर्षावरील तूर ११० क्विंटल, मूग ६१ क्विंटल, उडीद ४६ क्विंटल बियाणे वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीनचे १५ वर्षाआतील बियाणे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

--कोट--

महाडीबीटी पोर्टलमार्फत बियाणे वितरण समितीत प्रोड्यूसर कंपनीचा एक सदस्य असावा असे परिपत्रकात नमूद आहे. यामध्ये ती समिती जाहीर का केली नाही?, यामागे हेतू काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच.

Web Title: Subsidies to farmers for agricultural inputs; Lottery selection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.