शिष्यवृत्ती परीक्षेत अकोट तालुक्याचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:05+5:302021-08-21T04:23:05+5:30

आकोट तालुक्यातील आजपर्यंतचा उच्चांक आहे. गतवर्षी १० शिष्यवृत्ती तालुक्याला मिळाल्या होत्या. या ५४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपये, असा ...

Success of Akot taluka in scholarship examination | शिष्यवृत्ती परीक्षेत अकोट तालुक्याचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत अकोट तालुक्याचे यश

Next

आकोट तालुक्यातील आजपर्यंतचा उच्चांक आहे. गतवर्षी १० शिष्यवृत्ती तालुक्याला मिळाल्या होत्या. या ५४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपये, असा सुमारे २६ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

---------------------------

शाळानिहाय पात्र विद्यार्थी

अकोट तालुक्यातील भाऊसाहेब पोटे विद्यालय १२, गणगणे विद्यालय ९, सरस्वती विद्यालय ९, शिवाजी विद्यालय ८, ल. गणगणे, वडाळी ३, नेहरू अकोलखेड ३, गजानन अकोली २, शिवाजी विद्यालय आसेगाव २, लोकमान्य उमरा २, तसेच विवेकानंद बळेगाव, शाहू जऊळका, यशोदा आकोट, सखाराम महाराज, केळीवेळी, गुरुदेव बोर्डी, नरसिंग महा अकोट यांचे प्रत्येकी १ असे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

------------------

अशी असते परीक्षा

दीड लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १८० गुणांची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी, असे दोन पेपर असतात. या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीच्या शिक्षणासाठी एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.

------------------

‘मिशन एनएमएमएस अकोट’

अकोटचे नायब तहसीलदार हरीश गुरव यांच्या संकल्पनेतून मिशन एनएमएमएस मिशन सुरू झाले. जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भास्कर, गटशिक्षणाधिकारी विजय हाडोळे, तालुका मुख्याध्यापक संघाचे नेतृत्वाखाली तज्ज्ञ शिक्षकांच्या सहकार्यातून आखणी केली. तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा बोलावून या मिशनची रूपरेषा ठरवली. शनिवारी, रविवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे यांनीही उद्बोधन केले.

Web Title: Success of Akot taluka in scholarship examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.