केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या यशोगाथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:48 AM2020-02-18T11:48:44+5:302020-02-18T11:49:12+5:30
शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री पुरुषोत्तम रुपानी यांच्यासमोर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनात मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतीचे नियोजन व उत्तम व्यवस्थापन केल्यास उत्पादन दुप्पट होते; परंतु त्यासाठी योग्य तंत्रज्ञान व मार्गदर्शनाची गरज आहे. ही गरज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व यूपीएलने पूर्ण केल्याची यशोगाथा वºहाडातील शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री पुरुषोत्तम रुपानी यांच्यासमोर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनात मांडली.
यूपीएलच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला ना. रुपानी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासह व्यासपीठावर आ. गोवर्धन शर्मा, माजी महापौर विजय अग्रवाल, सीसीएफआय आणि यूपीएलचे अध्यक्ष रज्जूभाई श्राफ, उपाध्यक्ष सॅन्ड्रा श्राफ, अजित कुमार, प्रताप रणखांब, समीर टंडन, डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले, डॉ.डी. एम. मानकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सूरज ओहाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांनी यशोगाथा सादर केल्या. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील पातखेड येथील शेतकरी जगन्नाथ कुचर यांनी दोन एकरात यावर्षी ३० क्विंटल कापूस उत्पादन घेतल्याचे सांगितले. विशेष म्हणजे कोरडवाहू क्षेत्र असल्याचे ते म्हणाले. यासाठी शेतकरी शेतीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन करू न नियमित सर्वेक्षण करावे लागते. गत तीन वर्षापूर्वी कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप वाढला होता.
त्यामुळे आम्ही हतबल झालो होेतो; परंतु डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, यूपीएल आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे यावर्षी नियोजन व व्यवस्थापन केले. त्याचा फायदा झाला. यवतमाळ जिल्ह्यातील बोधगव्हाण येथील शेतकरी ओंकार राऊत यांनी यशोगथा कथन करताना कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतल्याचे सांगितले. यूपीएल व कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. येथे उपस्थित शेतकºयांना रज्जूभाई श्राफ म्हणाले, आपला देश कृषी क्षेत्रात अग्रगण्य आहे.
व्यवस्थित तंत्रज्ञान वापरल्यास उत्पादनात वाढ होऊन देश विकास साधता येईल. गरिबीवर मात करायची असेल तर उत्पादन वाढवावे लागणार आहे. शेतकरी हुशार आहेत. त्यांना जे सांगितले त्याचा अवलंब करतात; परंतु त्यासाठी तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे श्रॉफ यांनी सांगितले.
पश्चिम विदर्भातून शेतकºयांची उपस्थिती
बुलडाणा जिल्ह्यतील सोयगाव येथील शेतकरी विष्णू बुधवंत यांनी मक्याचे विक्रमी उत्पादन घेतल्याचे सांगितले. यूपीएलच्या लष्करी अळी प्रतिबंधक उपाययोजना केल्या. कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन लाभल्याने या अळीवर नियंत्रण मिळविता आले. यवतमाळ जिल्ह्यातील राजेश इंगोले यांनीही कपाशी पिकाच्या विक्रमी उत्पादनाची माहिती दिली.