चिमुकल्या विद्यार्थ्यांचे असेही पक्षीप्रेम
By Admin | Published: March 19, 2017 01:28 PM2017-03-19T13:28:44+5:302017-03-19T13:28:44+5:30
एसएमसी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचे रणरणत्या उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी जलपात्राची उभारणी करुन शाळेच्या परिसरात लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
पक्ष्यांसाठी झाडांवर लावले जलपात्र : नागरिकांनाही केल्या जातेय आवाहन
वाशिम : येथील एसएमसी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचे रणरणत्या उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी जलपात्राची उभारणी करुन शाळेच्या परिसरात लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी त्यांना प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून संपूर्ण भारत देशता साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य जाणुन स्थानिक एम.एस.सी.इंग्लीश स्कुल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी जलपात्राची उभारणी केली आहे.सध्या पृथ्वीवरील वाढते तापमान झपाट्याने होत असलेले आधुनिकीकरण, यांत्रीकीकरण आणि िनसर्गाचा होत चाललेला ऱ्हास याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. सोबतच सध्याचे वाढते शहरीकरण, सिमेंट कॉक्रीटीकरण शेतमाध्ये होत असलेल्या रासायनिक किटकनाशकावर व शेतामध्ये खताचा वापर होत आहे. यामुळे पक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.त्यातच मोबाईल टॉवर, इंटरनेटचा अतिवापर आणि त्यातुन निघणाऱ्या लहरींचा फटका पक्षांना बसत आहे. प्रत्यक्षात दिसणारा पक्षी आता फक्त लहान मुलांना चिमणीच दिसण्याची वेळ आली आहे. पक्षी हा निसर्गाचा अतिशय महत्वाचा घटक असून तो पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याचा एक महत्वाचा दुवा आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इको क्लब च्या माध्यमातून शाळेच्या परिसरात जलपात्राची उभारणी केली असून पक्षांना दाणे, पाण्याची व्यवस्था सुध्दा करण्यास आणि आहे तसेच नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर व आजुबाजुच्या परिसरात या उन्हाळ्यात पाण्याचे छोटेसे भांडे ठेवावे व पक्षांना दाणे टाकावे, यामुळे पक्षांना रोडावणाऱ्या संख्येला आळा बसणार ओह. तसेच त्यांचे टिकविण्यासाठी जास्त हातभार लावावा असे आवाहन शाळेच्या प्राचार्य मिना उबगडे ,हरित सेने शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी व चिमुकल्यांनी केले आहे.