सुहानी बोराडेने देशपातळीवर अकोल्याचे नावलौकिक वाढविले!
By रवी दामोदर | Published: April 4, 2024 03:56 PM2024-04-04T15:56:45+5:302024-04-04T15:57:30+5:30
बॉक्सिंग स्पर्धेत देशात ठरली अव्वल : रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत
अकोला : स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे नॅशनल बॉक्सिंग अकादमी रोहतक, हरियाणा येथे आयोजित दुसर्या ज्युनियर राष्ट्रीय निवड प्रक्रियेत, दिल्ली मणिपूर हरियाणा, पंजाबच्या कुस्तीपटूंना पराभूत करून देशातील 'नंबर वन' क्रमांकासह भारतीय संघात स्थान पटकाविणार्या अकोला क्रीडा प्रबोधिनीची सुहानी बोराडे बुधवारी अकोला आगमनप्रसंगी रेल्वे स्थानक येथे क्रीडाप्रेमींकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
स्थानिक वसंत देसाई स्टेडियमस्थित अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची बॉक्सर सुहानी बोराडे हिने अगदी लहान वयातच अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक व अनेक पदके पटकावली आहेत. बॉक्सिंग क्षेत्रात अलौकिक कामगिरी करुन भारतीय संघात स्थान पटकाविणार्या सुहानीने अपेक्षा उंचाविल्या आहेत. तिला क्रीडा प्रबोधिनी संघाचे मुख्य प्रशिक्षक व जिल्हा क्रीड़ा अधिकारी सतीशचंद्र भट्ट, योगेश निषाद, आदित्य मने, गजानन कबीर,दिया बचे मार्गदर्शन लाभले.
बॉक्सिंग संघात निवड झाल्यानंतर अकोल्यात जंगी स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानक येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमात बॉक्सिंग क्षेत्रातील दिग्गज मंडळीने सुहानीच्या कामगिरीची पाठ थोपटून स्वागत केले. सुहानीने पश्चिम भारत बॉक्सिंगमध्ये अकोला आणि महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलेआहे. स्पर्धा, राज्यराज्यशालेय सब- ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व कांस्य पदक मिळवून दिले.