पातूर तालुक्यात विनयभंग प्रकरणातील आरोपीने गळफास घेऊन केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 04:59 PM2017-11-14T16:59:01+5:302017-11-14T17:01:26+5:30
पातूर : पातूर तालुक्यातील माळराजुरा येथे ११ नोव्हेंबरच्या रात्री सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून अटक झालेल्या आरोपी सासºयाची १३ नोव्हेंबरला सुटका झाली होती. त्यानंतर त्याने रात्री शिवारातील झाडाला गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केल्याची बाब १४ नोव्हेंबरला उघडकीस आली.

पातूर तालुक्यातील माळराजुरा येथील रंगलाल नाादेव राठोड (५५) याने ११ नोव्हेंबरच्या रात्री घरात त्याच्या २२ वर्षीय सुनेचा विनयभंग केला; त्यावेळी तिने प्रतिकार करून सदर घटना सासूला सांगितली. त्यामुळे चिडलेल्या रंगलालने तिला कुºहाडीने मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी पीडित सुनेने दाखल केलेल्या तक्रारीवरून १२ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा पातूर पोलिसांनी रंगलाल राठोडविरुद्ध भा.दं.वि.च्या ३५४, ३२४, ५०४ कलमप्रमाणे गुन्हा दाखल करून लगेच अटक केली होती. १३ नोव्हेंबरच्या दुपारी सुटका झाल्यानंतर रंगलाल राठोडने माळराजुरा शेतशिवार सर्व्हे नं. ६८ मधील बजरंगबलीच्या मंदिराजवळील पिंपळाचे झाडाला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे. मृतकाकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,दोन मुली,सून असा आप्त परिवार आहे. या घटनेप्रकरणी फिर्यादी दशरथ नामदेव राठोड (४७) याच्या फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)