‘आत्महत्यामुक्त गावा’ची घेतली जाणार शपथ!
By admin | Published: October 12, 2015 02:03 AM2015-10-12T02:03:15+5:302015-10-12T02:03:15+5:30
गावागावांत ‘बळीराजा’ समिती गठित करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश.
अकोला: गावात कोणीही आत्महत्या करणार नाही, यासाठी जिल्ह्यात ग्रामसभांमध्ये 'आत्महत्यामुक्त गावा'ची शपथ घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्यके गावात ह्यबळीराजाह्ण समित्या गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरुवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले. अत्यल्प पाऊस, गारपीट तर कधी अवकाळीमुळे नापिकीच्या परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकरी आ त्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. घरातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबांची वाताहत होते. शे तकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये सरकारकडून दिली जाणारी मदत अपुरी पडते. या पृष्ठभूमीवर शेतकरी आ त्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात ह्यदिलासाह्ण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच शेतकर्यांच्या आत्महत्या होऊच नये, आत्महत्या करण्याची वेळ शेतकर्यांवर येऊ नये, यासाठी 'आत्महत्यामुक्त गावा'चा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्या या उ पक्रमात गावागावांत होणार्या ग्रामसभांमध्ये 'आत्महत्यामुक्त गावा'ची शपथ घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात 'बळीराजा' समित्या गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व सातही तहसीलदारांना दिले आहेत. गावात शेतकर्यासह कोणाचीही आत्महत्या होणार नाही, याबाबत गावातील बळीराजा समित्यांकडून समुपदेशनाद्वारे शेतकर्यांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.