आरोग्य कर्मचा-याची विष प्राशन करून आत्महत्या!

By admin | Published: September 16, 2016 02:56 AM2016-09-16T02:56:11+5:302016-09-16T02:56:11+5:30

बुलडाणा सामन्य रुग्णालयातील कर्मचार्‍याने विष प्राशन करुन आत्महत्या केली.

Suicide by the health worker's poisoning! | आरोग्य कर्मचा-याची विष प्राशन करून आत्महत्या!

आरोग्य कर्मचा-याची विष प्राशन करून आत्महत्या!

Next

बुलडाणा, दि. १५ - येथील सामान्य रुग्णालयात 'ब्रदर' म्हणून कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचार्‍याने स्वत:च्या शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना आज १५ सप्टेंबर रोजी हतेडी येथे घडली. या घटनेमुळे आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील हतेडी येथील मूळ रहिवासी असलेला पवन मल्हारी इंगळे वय २४ हा येथील सामान्य रुग्णालयात ब्रदर म्हणून कार्यरत होता.
दरम्यान, गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्याने गावातील स्वत:च्या शेतात विषारी द्रव्य प्राशन केले.
या घटनेची माहिती काही वेळातच त्याच्या नातेवाइकांना मिळाली. माहिती मिळताच नातेवाइकांनी त्याला येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला शहरातील एका खासगी दवाखान्यात भरती केले; परंतु शरिरात विष जास्त झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by the health worker's poisoning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.