पोलीस कर्मचा-याची आत्महत्या

By admin | Published: August 6, 2016 01:55 AM2016-08-06T01:55:27+5:302016-08-06T01:55:27+5:30

पोलीस मुख्यालयातील कर्मचा-याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट.

The suicide of a police employee | पोलीस कर्मचा-याची आत्महत्या

पोलीस कर्मचा-याची आत्महत्या

Next

अकोला, दि. ५: पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी रोशन जगताप हे रामदासपेठ पोलीस स्टेशननजीक असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये रहिवासी आहेत. गुरुवारी मध्यरात्री त्यांनी याच पोलीस वसाहतमधील निवासस्थानामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; मात्र रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
पोलीस कर्मचारी रोशन जगताप यांना झटपट श्रीमंत होण्याचा ध्यास होता. त्यासाठी ते रोजच लॉटरीचे टिकीट खरेदी करीत असल्याची माहिती आहे. वर्षानुवर्षापासून ते टिकीट खरेदी करायचे; मात्र त्यांना एकदाही लॉटरी लागली नसल्याची माहिती आहे.

दोन वेळा अपघात
रोशन जगताप यांचा दोन वेळा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती; मात्र अनेक वेळा त्यांची प्रकृती ठीक राहत नव्हती, अशी माहिती त्यांच्या सहकार्‍यांनी दिली.

Web Title: The suicide of a police employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.