आत्महत्याग्रस्त १२ कुटुंब मदतीसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 01:44 PM2019-08-23T13:44:16+5:302019-08-23T13:44:20+5:30
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १२ आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत.
अकोला: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १२ आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक गुरुवारी पार पडली.
पात्र ठरलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांमध्ये अकोला तालुक्यातील गोपालखेड येथील माणिक अरुण मोडक, निपाणा येथील गजानन महादेव राऊत, श्रीहरी तुकाराम झटाले-दोनवाडा, सिद्धोधन संपत शेगोकार-गोरेगाव बुद्रूक, बाळापूर तालुक्यातील चिंचोली गणू येथील उत्तम लक्ष्मण जुमडे, गणेश वासुदेव बायस्कार, दादाराव महादेव हिवराळे- नया अंदुरा, अश्वस्थामा भास्कर जढाळ- वाडेगाव, पातूर तालुक्यातील पाडसिंगी येथील शांताराम चिनकारी गवई, महादेव शांताराम परकाळे-सस्ती, बाळू आकोशी घायवट-कार्ला, तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील मंगेश विठ्ठल सरोदे यांचा समावेश आहे. तर पातूर तालुक्यातील बाभूळगाव येथील नरसिंग जगदेव राठोड, अकोला तालुक्यातील कानशिवणी येथील नारायण पूर्णाजी वाघमारे, अन्वी मिर्झापूर येथील महादेव पूर्णाजी घाटोळे यांच्या प्रस्तावाची फेरचौकशी केली जाणार आहे. अपात्र ठरलेल्यांमध्ये अकोट तालुक्यातील खिरकुंड येथील भानूबाई काशिराम सांगळे, पातूर तालुक्यातील मलकापूर येथील रोहिदास रायसिंग आडे, पळसखेड येथील कौशल्या मूलचंद जाधव यांच्या कुटुंबाचा समावेश आहे.