७५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Published: April 28, 2017 01:07 AM2017-04-28T01:07:59+5:302017-04-28T01:07:59+5:30

तेल्हारा: तालुक्यातील थार येथे २६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास येथील रहिवासी असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

Suicide by taking a 75-year-old aged man | ७५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

७५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Next

तेल्हारा: तालुक्यातील थार येथे २६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास येथील रहिवासी असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
थार येथील रहिवासी यशवंत पुंडलिक हेरोडे या वृद्धाने २६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता राहत्या घरातील छताच्या पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद साईनगर तेल्हारा येथील रहिवाशी सुरज मधुकर हेरोडे यांनी तेल्हारा पोलिसात दिली. त्यांना मोहन चिंतामन हेरोडे यांनी फोन करून या घटनेबाबत सांगितले होते. त्यानंतर सुरज हेरोडे यांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा केल्यावर तेल्हारा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी तेल्हारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by taking a 75-year-old aged man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.