दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Published: April 23, 2017 08:52 AM2017-04-23T08:52:50+5:302017-04-23T08:52:50+5:30
१५ वर्षीय मुलीने आणि सूर्योदय बालगृहातील एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना
अकोला : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील न्यू खेतान नगरातील रहिवासी एका १५ वर्षीय मुलीने आणि सूर्योदय बालगृहातील एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उजेडात आली.
यामधील सदर मुलीने शनिवारी आत्महत्या केली असून, मुलाने शुक्रवारीच आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोन्ही आत्महत्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. न्यू खेतान नगरातील रहिवासी पल्लवी वसू नामक मुलीने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली, तर सूर्योदय बालसुधारगृहातील एका मुलानेही आत्महत्या केली आहे.
या दोन्ही प्रकरणांत खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. सदर मुलाला असाध्य आजार असल्याने त्याने आत्महत्या केली, तर मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.