वृद्ध शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Published: April 15, 2017 01:06 AM2017-04-15T01:06:21+5:302017-04-15T01:06:21+5:30
हातगाव (अकोला): ६४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
हातगाव (अकोला): येथील (६४) वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने त्याच्या राहत्या घरातील ओसरीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
हातगाव येथील शेतकरी मुदगल मोतीराम डांगे (६४) यांनी त्यांच्या राहत्या घरातील ओसरीमध्ये १३ एप्रिलच्या दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, जनार्दन खंडेराव यांनी भेट देऊन पंचनामा केला आणि प्रेत पोस्टमार्टमसाठी मूर्तिजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मुदगल डांगे यांच्या पश्चात दोन मुली, एक मलगा असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहिस्तोवर आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.