थार येथील शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Published: June 25, 2016 02:14 AM2016-06-25T02:14:20+5:302016-06-25T02:14:20+5:30

बँकेच्या कर्जापायी व सततच्या नापिकीमुळे झाडाला गळफास

Suicide by taking a thief from Thar farmer | थार येथील शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

थार येथील शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

Next

तेल्हारा (अकोला): तालुक्यातील थार येथील शेतकर्‍याने बँकेच्या कर्जापायी व सततच्या नापिकीमुळे २४ जून रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
तेल्हारा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या थार येथील शेतकरी रघुनाथ सदाशिव फोकमारे (५0) या शेतकर्‍याने सततच्या नापिकी व कर्जामुळे आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद इंद्रभान सदाशिव फोकमारे रा. थार यांनी तेल्हारा पोलिसात दिली. मृतक रघुनाथ फोकमारे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ४५ हजार कर्ज होते व गेल्या ३ वर्षांपासूनच्या नापिकीमुळे ते बेचैन होते. त्यांच्याकडे तीन एकर शेती असून त्यंच्या पश्‍चात २ मुले, २ मुली आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार नंदकिशोर नागलकर, रामभाऊ भास्कर हे घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

Web Title: Suicide by taking a thief from Thar farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.