तीन कर्जबाजारी शेतक-यांच्याआत्महत्या
By admin | Published: March 14, 2015 01:38 AM2015-03-14T01:38:05+5:302015-03-14T01:38:05+5:30
अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील घटना.
अकोला: सततची नापिकी व कर्जाच्या ओझ्यामुळे अकोला व बुलडाणा जिल्ह्यात तीन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील शेतकरी दयाराम घटे यांनी गुरुवारी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. सततची नापिकी आणि सोसायटीचे ६0 हजार रुपयाचे कर्ज यामुळे घटे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, एक मुलगी व नातवंड असा आप्त परिवार आहे. आत्महत्येच्या दोन घटना घटना बुलडाणा जिल्ह्यात घडल्या. बुलडाणा तालुक्यातील कुलमखेड येथे घडली. ज्ञानेश्वर पुंडलिक कानडजे (वय ४५) या शेतकर्याने गुरुवारी रात्री विषारी किटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. सततची नापीकी, जमीन आणि मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. यामध्ये महाराष्ट्र बँकेच्या चांडोळ शाखेचे ५0 हजार रूपये कर्ज असल्याची माहीती आहे. कर्जापायी त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगीतले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, आई वडिल असा आप्त परिवार आहे. अमडापूर जवळ असलेल्या हराळखेड येथील एका ६७ वर्षीय शेतकर्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ मार्च रोजी घडली. सोनाजी गवई यांच्याकडे ढुमा शिवारामध्ये गट नंबर २४२ मध्ये १.६२ आर ४ एकर शेती असून त्यांच्याकडे स्टेट बँकेचे कर्ज असल्याचे ना तेवाईकांनी सांगितले. १३ मार्च रोजी सकाळी ८ वाजेला आत्माराम गवई यांनी स्वत:च्या घरातील लाकडी बल्लीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.