‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असलेल्या युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:01 AM2020-06-22T10:01:07+5:302020-06-22T10:01:16+5:30

युवतीला सदर इसम हा विवाहित असल्याचे माहीत झाल्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे

Suicide of a young woman in a 'live in relationship' | ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असलेल्या युवतीची आत्महत्या

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असलेल्या युवतीची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली असून, ही युवती एकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच या युवतीने आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून, पोलिसांनीही त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
विवाहित असलेल्या एका पुरुषासोबत एक युवती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये  होती. या युवतीला सदर इसम हा विवाहित असल्याचे माहीत झाल्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. याच वादानंतर सदर युवतीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असता हा गंभीर प्रकार उघड झाल्याची माहिती आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमुळेच एका युवतीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे युवतींनी स्वप्नाच्या जगात न जगता वास्तविकतेचे भान ठेवल्यास असा प्रकार घडणार नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Suicide of a young woman in a 'live in relationship'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.