युवा शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: February 24, 2016 01:44 AM2016-02-24T01:44:51+5:302016-02-24T01:44:51+5:30
अकोला जिल्ह्यातील घटना.
Next
पळसो बढे (अकोला) : येथील रवी अविनाश बढे वय ३५ यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या राहत्या घरात गळ्याला दोर बांधून आपली जीवनयात्रा संपविली. आई, भाऊ, पत्नी, मुलगा असा आप्त परिार आहे. २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता त्याच्या घरात शेजारील नागरिकाने डोकावून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. नंतर पोलीस पाटील मनोज काळे यांनी पोलीस स्टेशन बोरगाव मंजुला फोन केला असता ठाणेदार भास्कर तवर व इंगळे, मानेवार घटनास्थळी पंचनामा केला असता आकस्मात मृत्युची नोंद केली. पुढील तपास इंगळे, मानेवार करीत आहे. त्यांच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्र यांचे १६९२९ रुपये एवढे कर्ज आहे.