कर्जबाजारी युवा शेतक-याची आत्महत्या

By admin | Published: January 7, 2016 02:31 AM2016-01-07T02:31:49+5:302016-01-07T02:31:49+5:30

राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या.

Suicides by the debt-ridden young farmer | कर्जबाजारी युवा शेतक-याची आत्महत्या

कर्जबाजारी युवा शेतक-याची आत्महत्या

Next

बुलडाणा : सततची नापिकी आणि वाढता कर्जाचा डोंगर यामुळे नैराश्य आलेल्या गिरडा येथील एका युवा शेतकर्‍याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. हरिबा ऊर्फ सुनील केशवराव शेळके (३५) हे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. हरिबा व त्यांचे दोन भाऊ यांच्याकडे एक एकर शेती आहे. एक एकर शेतीतील वाट्यावर येणार्‍या गुंठय़ावर हरीबा शेती करत होते. यामधून होणार्‍या उत्पन्नाच्या भरवशावर कुटुंबाची गुजराण होत नसल्याने हरिबा व त्याची पत्नी अनिता (३0) हे दुसर्‍यांच्या शेतात मजुरी करायचे. हरिबावर सेंट्रल बँकेच्या पाडळी शाखेचे ३0 हजार रुपये कर्ज होते. याशिवाय उसनवारीचे ४५ हजार रुपये होते. सततची नापिकी व वाढते कर्ज, त्यातच दुष्काळ पडल्याने हाताला काम मिळत नव्हते. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या हरिबाने ५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. घटना घडली त्यावेळी त्याची पत्नी आजारी असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी बाहेरगावी गेली होती. हरिबाच्या पश्‍चात पत्नी, बबलू (१२), पायल (९) व वैभव (६) ही तीन मुले व परिवार आहे.

Web Title: Suicides by the debt-ridden young farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.