अकोला जिल्ह्यात कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: August 6, 2015 12:10 AM2015-08-06T00:10:27+5:302015-08-06T00:10:27+5:30
नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून बाश्रीटाकळी तालुक्यातील शेतक-याने विष प्राशन करून केली आत्महत्या.
Next
सायखेड (जि. अकोला): नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून बाश्रीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथील एका शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना, मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी घडली. बाळकृष्ण श्रीराम खंडारे असे मृतक शेतकर्याचे नाव असून, त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र, बाश्रीटाकळी शाखेचे ४0 हजार रुपयांचे कर्ज होते. तसेच खासगी सावकाराचेही कर्ज असल्याचे समजते. कर्जफेडीच्या विवंचनेतच त्यांनी घरामध्ये विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. बुधवारी त्यांच्यावर पुनोती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.