सततच्या नापिकीला कंटाळून टिटवा येथील युवा शेतकर्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 08:16 PM2017-11-06T20:16:11+5:302017-11-07T00:29:51+5:30
पिंजर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून टिटवा येथील २७ वर्षीय युवा शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. संतोष शंकरराव अहेर असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

संतोष अहेर यांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतीत अपेक्षित उ त्पन्न होत नव्हते. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी २९ ऑक्टोबर रोजी विष प्राशन केले होते. त्यांना तातडीने अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ५ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील व आप्त परिवार आहे.