‘सवरेपचार’मध्ये ‘ऑक्सिजन’चा पुरेसा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:01 AM2017-08-14T02:01:12+5:302017-08-14T02:02:41+5:30

अकोला : ऑक्सिजनचा ऐनवेळी तुटवडा भासून, रुग्णांवर गंभीर प्रसंग ओढवू नये, म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेशा साठा ठेवला जातो. सर्व कक्ष मिळून येथे दररोज ४0 ते ५0 सिलिंडर तर महिन्याला सुमारे १२00 ते १५00  सिलिंडरची आवश्यकता असून, ती पूर्ण केली जाते, अशी माहिती ‘सवरेपचार’ रुग्णालय प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Suitable storage of 'Oxygen' in 'Saavarachar' | ‘सवरेपचार’मध्ये ‘ऑक्सिजन’चा पुरेसा साठा

‘सवरेपचार’मध्ये ‘ऑक्सिजन’चा पुरेसा साठा

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील घटनेच्या पुनरावृत्तीचा धोका नाही दररोज पुरेशा प्रमाणात पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ऑक्सिजनचा ऐनवेळी तुटवडा भासून, रुग्णांवर गंभीर प्रसंग ओढवू नये, म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेशा साठा ठेवला जातो. सर्व कक्ष मिळून येथे दररोज ४0 ते ५0 सिलिंडर तर महिन्याला सुमारे १२00 ते १५00  सिलिंडरची आवश्यकता असून, ती पूर्ण केली जाते, अशी माहिती ‘सवरेपचार’ रुग्णालय प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठय़ाअभावी जवळपास ६३ बालकांना जीव गमवावा लागला. या पृष्ठभूमीवर पश्‍चिम वर्‍हाडाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार  रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेतला असता, येथे सिलिंडर पुरेसे असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातील सर्वच कक्षांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यात येतात.

महिन्याला १२00 ते १५00 सिलिंडरची आवश्यकता
रुग्णालयाला दररोज साधारणपणे ४0 ते ५0 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासते. यामध्ये अतिदक्षता (आयसीयू) विभागामध्ये  ७ क्यूबिक एमएमचे सरासरी १५ ते २0  सिलिंडर लागतात. व्हेंटिलेटर लावले, तर हा आकडा ४0 पर्यंत जातो. बालरोग विभागातील नवजात शिशू उपचार युनिटमध्ये दररोज ७ ते १२ जम्बो सिलिंडरची गरज भासते. मुख्य शल्यक्रिया गृह (ऑपरेशन थिएटर) मध्ये आठवड्याला १0 ते १५ सिलिंडर लागतात. अशाप्रकारे रुग्णालयाची महिन्याची गरज साधारपणे १२00 ते १५00 सिलिंडरची आहे.

‘ऑक्सिजन’चे कंत्राट औरंगाबादच्या कंपनीला
 रुग्णालयाला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी रुग्णालयाच्यावतीने निविदा प्रक्रिया राबवून ठेका देण्यात आलेला आहे. वर्षभरासाठी हा ठेका असून, दरवर्षी यासाठी निविदा काढल्या जातात. त्यानुसार संबंधित ठेकेदार ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करतो. सध्या औरंगाबाद येथील सागर गॅसेस या कंपनीला सिलिंडर पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले असून, या कंपनीला वेळच्या वेळी देयक अदा करण्यात येत असल्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा अव्याहतपणे होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

‘सवरेपचार’ रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा मुळीच तुटवडा नाही. कंत्राट दिलेल्या कंपनीला वेळावेळी देयक दिले जात असल्यामुळे त्यांच्याकडून ऑक्सिजन सिलिंडरचा व्यवस्थित पुरवठा होत आहे. 
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, 
प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

Web Title: Suitable storage of 'Oxygen' in 'Saavarachar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.