तापमानाचा उन्हाळी पिके, भाजीपाल्याला फटका!

By admin | Published: May 22, 2014 07:02 PM2014-05-22T19:02:10+5:302014-05-22T22:14:03+5:30

अकोल्याचे तापमान ४३ अंश

Summer crop, vegetable shock of temperature! | तापमानाचा उन्हाळी पिके, भाजीपाल्याला फटका!

तापमानाचा उन्हाळी पिके, भाजीपाल्याला फटका!

Next

अकोला : गेल्यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे त्याचा लाभ रब्बी व इतर फळे, भाजीपाला पिकांना मिळले, अशी अपेक्षा होती. मात्र, तापमानाचा पारा वाढतच असल्यामुळे या पिकांना फटका बसत आहे. गुरुवारी हे तापमान ४३ डिग्री अंशावर पोहोचले होते.
जिल्ह्यात बर्‍यापैकी उन्हाळी क्षेत्र आहे. भुईमूग व इतर पिके शेतकरी घेतात. तसेच जिल्‘ात ३,१५० हेक्टरवर संत्रा आहे. दुसर्‍या क्रमांकावर २३०० हेक्टर लिंबू असून, केळी २२५० हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५०, चिकू ७५, सीताफळ ७५, आवळा ९० तर आंबा ६२५ हेक्टर क्षेत्रावर आहे. गेल्या दोन वर्षांत शेतकर्‍यांनी फळ पिकाचे क्षेत्र वाढविले आहे; परंतु वाढते तापमान व झपाट्याने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत प्रंचड घट होत आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणी खोल जाण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी हे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील लिंबाची देशभरात ओळख आहे. परप्रांतात जाणारे येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे.
दरम्यान, अकोल्याचे तापमान गुरुवारी ४३ अंशावर पोहोचले होते. येत्या दोन दिवसांत हे तापमान म्हणजेच शुक्रवारला ४२, शनिवार ४३ व रविवारी हे तापमान ४४ वर पोेहोचण्याची शक्यता हवमान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Summer crop, vegetable shock of temperature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.