आगर परिसरात वाढली उन्हाळी वांग्याची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:17 AM2021-04-06T04:17:37+5:302021-04-06T04:17:37+5:30
---------------------------------- लॉकडाऊनच्या चर्चेने वधू-वर पिता चिंतेत अकोट : उन्हाळ्यात सुरूवात होताच सगळीकडे लग्नाची धामधूम असते, परंतु कोरोनाने चिंता वाढविल्याने ...
----------------------------------
लॉकडाऊनच्या चर्चेने वधू-वर पिता चिंतेत
अकोट : उन्हाळ्यात सुरूवात होताच सगळीकडे लग्नाची धामधूम असते, परंतु कोरोनाने चिंता वाढविल्याने नातेवाईकाच्या लग्नात जायचे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. संभाव्य लॉकडाऊनमुळे वधू- वर पिता चांगलेच चिंतेत पडले आहेत.
-------------------------
गावरान आमराई दिसेना ; आंबा ही दुर्मिळ
मूर्तिजापूर : गावखेड्यात पूर्वीच्या काळात हिरवीगार डहाळीने आकर्षित करत असलेली गावरान आंब्यांच्या आमराया आता दुर्मिळ झाल्या आहेत. संगोपणाऐवजी जुन्या हिरवेगार आम्रवृक्षावर कुऱ्हाडीचे घाव बसत असल्याने गावरान आंबा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.
----------------------------------
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त
अकोट: मागील काही दिवसापासून शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना, लहान मुलांना रस्ता पार करताना अडचण जात आहे. कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
-----------------------------------------------
घुसर-म्हैसांग मार्गावर गतिरोधकाची मागणी
म्हातोडी: घुसर ते म्हैसांग मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. सकाळी व सायंकाळी या मार्गावर विद्यार्थ्यांची गर्दी असते. संभाव्य धोका टाळण्यासाठी गतिरोधक निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली.
--------------------------------------------------------
बार्शीटाकळी शहरात स्वच्छता मोहीम राबवावी
बार्शीटाकळी : शहरातील काही वाॅर्डामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. काही नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. हा प्रकारही बंद करण्यासाठी मनपाने निर्देश द्यावे. या परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
-----------------------------------------------------
अंगणवाडी केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव
पातूर: ग्रामीण तसेच शहरी भागातील काही अंगणवाडी केंद्राची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन अंगणवाडीच्या इमारतींची दुरुस्ती करून केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------
नियमबाह्य वाहतूक ठरतेय धोक्याची
मूर्तिजापूर : नियमबाह्य व विना परवाना अल्पवयीन वाहन चालक मोठ्या प्रमाणात वाहन चालवित आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे वाहतूक विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
----------------------------------------------
खासगी वाहनांकडून नियमांचे उल्लंघन
मूर्तिजापूर: शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांबा पासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली, तरी मूर्तिजापूर येथील बसस्थानक परिसरात नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
-------------------------------------------------
परवानगी न घेताच घरांचे बांधकाम वाढले
बाळापूर: नगरपरिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल, तर नगरपरिषदेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते; मात्र शहरातील बहुतांश घरमालक नगरपरिषदेकडे परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
-------------------------------------
गावे हागणदारीमुक्त कागदावरच
पातूर: गावे हागणदारीमुक्त करण्याचा शासनाने ध्यास घेतला. याकरिता ग्रामपंचायती ही सरसावल्या. पुरस्कार मिळविले. मात्र, अनेक ग्रामपंचायती कागदावरच हागणदारीमुक्त आहे. खेड्यात शौचालय बांधण्यात आले मात्र त्याचा वापर होत नाही.
-----------------------------------------
लोंबकळत्या तारांमुळे अपघाताचा धोका
तेल्हारा: तालुक्यात अनेक ठिकाणी तारा लोंबकळलेल्या दिसतात. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. महावितरण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रोष व्यक्त होत आहे.