उन्हाळी परीक्षा : अर्ज सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:20 PM2019-03-19T13:20:58+5:302019-03-19T13:21:02+5:30
अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन उन्हाळी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी असणार आ
अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन उन्हाळी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी असणार आहे.
अमरावती विद्यापीठाशी संगलग्नित महाविद्यालयामध्ये दुसऱ्या टप्प्यातील सत्र शनिवार, २७ एप्रिलपासून, तर तिसऱ्या टप्प्यातील सत्र सोमवार, ३१ मेपासून तसेच पुढे सुरू होणाºया उन्हाळी २०१९ च्या विद्यापीठीय सत्रपद्धती व वार्षिक पद्धती अभ्यासक्रमाच्या नियमित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज स्वीकारण्याच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी आणखी एक संधी मिळाली असून, ही अंतिम संधी राहणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.