पिंजर परिसरात उन्हाळी भुईमुगाचे पीक बहरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:18 AM2021-04-09T04:18:53+5:302021-04-09T04:18:53+5:30

कॅनॉलच्या पाण्याच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाची लागवड केली. त्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने चांगला फायदा होणार असल्याचे चित्र, ...

Summer groundnut crop flourishes in Pinjar area! | पिंजर परिसरात उन्हाळी भुईमुगाचे पीक बहरले!

पिंजर परिसरात उन्हाळी भुईमुगाचे पीक बहरले!

Next

कॅनॉलच्या पाण्याच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाची लागवड केली. त्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने चांगला फायदा होणार असल्याचे चित्र, पिंपळगाव हांडे, घोंगा, झोडगा, इसापूर आदी भागात पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना पिकांचे सिंचन करता यावे, म्हणून शाखा अभियंता निलेश घारे, शाखा अभियंता प्रिया आगरकर लक्ष ठेऊन आहेत. पिंजर भागात महान पाटबंधारेचे एकूण १० बंधारे (तलाव) आहेत. यापूर्वी काही भागातील कॅनलमधून सुरळीत पाणीपुरवठा होत नव्हता, मात्र कार्यकारी अभियंता वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता प्रिया आगरकर, निलेश घारे यांनी काही ठिकाणी दुरुस्ती करून कॅनलचा पाणीपुरवठा सुरळीत केला, त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमूग व इतर पिकांचे उत्त्पन्न घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होणार असल्याचे चित्र आहे,

Web Title: Summer groundnut crop flourishes in Pinjar area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.