पांढुर्णा परिसरामधे उन्हाळी मूग पेरणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:33 AM2021-03-04T04:33:28+5:302021-03-04T04:33:28+5:30
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा गावासह परिसरामध्ये यावर्षी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. सोयाबीन, मूग, उडीद व तूर पिकांचे ...
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा गावासह परिसरामध्ये यावर्षी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. सोयाबीन, मूग, उडीद व तूर पिकांचे नुकसान झाले होते. तसेच हरभरा पिकालाही फटका बसला. शेतकऱ्यांनी जिद्द न सोडता आता उन्हाळी मूग लागवडीवर लक्ष केंद्रित केले आहे.
पांढुर्णा, अंधार सांगवी, चोंढी, पिंपळडोळीसह परिसरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मूग पेरणीस सुरूवात केली आहे. मूग पिकापासून आता शेतकऱ्यांना आशा आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता तरी या पिकामुळे मागील कर्ज फिटेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. शेतकऱ्यांनी मूग पेरणी करायला सुरवात केली आहे. यंदा सोयाबीन, उडीद, मूग व तूर आदी पिके हातची गेली. या पिकांचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे आता उन्हाळी मुगापासून शेतकऱ्यांना आशा आहे. सोयाबीन पेरणीकरिता काढलेले कर्ज भरण्यासाठी बँकेचे अधिकारी सतत घरी येत आहेत. बँकेचे कर्ज फेडता यावे. यासाठी आता उन्हाळी मुगाला पसंती दिल्याचे शेतकरी बाळू तिवाले यांनी सांगितले.
फोटो: