सुपर पॉवर घोटाळय़ातील आरोपीस वाशिम जिल्ह्यात अटक
By admin | Published: December 18, 2014 12:50 AM2014-12-18T00:50:56+5:302014-12-18T00:50:56+5:30
औरंगाबाद येथील सुपर पॉवर घोटाळा प्रकरण.
रिसोड (वाशिम) : औरंगाबाद येथील सुपर पॉवर घोटाळयातील एका आरोपीस वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीसांनी १६ डिसेंबर रोजी अटक केली. या आरोपीस औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. औरगाबाद येथील सुपर पॉवर कंपनीच्यावतिने दोन वर्षात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. याच कंपनीमधील एक एजन्ट रिसोड येथील आसनगल्लीमध्ये राहत असल्याची माहिती रिसोड पोलिसांना औरंगाबाद पोलिसांनी दिली. त्यानुसार रिसोड पोलिसांनी मुळचा लोणार येथील, परंतु सध्या रिसोडमध्ये राहत असलेल्या कैलास गजानन महाजन यास १६ डिसेंबर रोजी अटक केली. त्याला औरंगाबाद पोलिस घेवून गेल्याची माहिती रिसोड पोलीसांनी दिली. सुपर पॉवर घोटाळयातील आरोपी रिसोडमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना नाशिक येथे शिक्षण घेत असलेल्या आरोपीच्या मुलाकडून मिळाली होती.