अधीक्षक कृषी अधिकारी रजेवर, शेतकरी वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 02:58 PM2019-11-01T14:58:58+5:302019-11-01T14:59:05+5:30
कृषी विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ दीर्घ रजेवर गेले आहेत.
अकोला : जिल्ह्यात अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीशी शेतकरी झुंज देत असताना शेतीशी संबंधित सर्व विषय हाताळणाºया राज्याच्या कृषी विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यातच कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकरा सुरू आहेत. विम्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकºयांना दिलासा देत मार्गदर्शन करण्याचे सोडून अधीक्षक कृषी अधिकाºयांनी शेतकºयांना वाºयावर सोडण्याचा प्रकार घडला आहे.
राज्यात सर्वत्र १८ आॅक्टोबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीनचा समावेश आहे. तसेच सोयाबीनच्या काढणी पश्चात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या सर्व बाबी पाहता विमा कंपनीला नुकसान भरपाईसाठी ४८ तासांच्या आत माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाला तातडीने पंचनामे करावे लागत आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी प्रत्येक शेतकºयाच्या शेतात जाऊन पंचनामा होणार आहे. नैसर्गिक आपत्ती बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी, वीज कोसळून लागणारी आग, या आपत्तींमध्ये नुकसाग्रस्त क्षेत्राचे वैयक्तिक पंचनामे करावे लागतात. शेतात पसरवून ठेवलेल्या पिकांच्या काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत १४ दिवसांत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे नुकसान झाल्यास त्याचेही वैयक्तिक पातळीवर पंचनामे केले जातात. पंचनाम्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार पीक नुकसान सूचना फॉर्म भरून विमा कंपनीच्या अधिकृत मेलवर टाकावा लागतो. या संपूर्ण प्रक्रियेत कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामविकास विभाग, महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांशी समन्वय ठेवून तातडीने काम करावे लागते. त्यासाठी कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय यंत्रणेची प्रमुख व महत्त्वाची भूमिका आहे; मात्र ती जबाबदारी पार पाडण्याचे सोडून अधीक्षक कृषी अधिकारी वाघ २६ आॅक्टोबरपासून ५ ते ६ नोव्हेंबरपर्यंत रजेवर गेल्याची माहिती आहे. या काळात शेतकºयांनी कोणाशी संपर्क साधावा, असा प्रश्न आता आपत्तीग्रस्तांना पडत आहे.