पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांच्या मदतीसाठी सरसावले पोलिस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 05:02 PM2018-03-22T17:02:13+5:302018-03-22T17:02:13+5:30
अकोला : अकोला पोलिस दलातील रिक्त असलेल्या ६८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रीया राबविण्यात येत असून यामधील २१ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती प्रक्रीया गुरुवारपासून सुरु झालेली आहे.
अकोला : अकोला पोलिस दलातील रिक्त असलेल्या ६८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रीया राबविण्यात येत असून यामधील २१ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती प्रक्रीया गुरुवारपासून सुरु झालेली आहे. गुरुवारी मैदानी चाचणीसाठी आलेल्या शेकडो महिला उमेदवारांना रात्रीच्या जेवनाची व राहण्याची सुवीधा नसल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी तातडीने पोलिस मुख्यालयातील महिलांचा एक हॉल या उमेदवारांसाठी खुला करून दीला. यासोबतच त्यांच्या जेवनासह, आंघोळ व इतर सुवीधाही पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर यांनी उपलब्ध करून देत माणुसकीचा परिचय दिला.
अकोला जिल्हा पोलीस दलात महिला पोलीस यांच्या 21 जागा भरल्या जाणार आहेत, याकरिता २२ मार्च रोजी महिला पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी बाहेरगावच्या उमेदवारांची मोठी संख्या आहे. बुधवारी सायंकाळीच या उमेदवारांनी पोलिस मुख्यालयाच्या जवळपास माहिती घेताना व विचारपूस करताना दिसून आल्या. महिला उमेदवार राहण्यासाठी निवारा व जेवणासाठी खानावळी बाबत माहिती घेत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर यांना कळली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावला या महिला उमेदवारांची भेट घेउन भरतीसाठी आलेल्या मुलींना पोलीस मुख्यालय मध्ये बोलावून घेतले. त्यानंतर या महिला उमेदवारांना रात्री राहण्याची व सकाळी लवकर फ्रेश होण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. पोलीस मुख्यालयातील दरबार हॉल व मुलींचे ब्यारेक उपलब्ध करून दिले. नाश्ता जेवणाची एकूण 200 मुलींची व्यवस्था केली. पोलिस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी मुलींच्या अडचणी जाणूण घेत त्यांना सुवीधा उपलब्ध करून दिल्याने या २०० वर उमेदवारांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
हळव्या मनाचे पोलिस अधीक्षक
अकोला जिल्हयात गत तीन वर्षांपूर्वीपासून महिला उमेदवारांची भरती प्रक्रीया राबविण्यात येत आहे. या महिला उमेदवार मंदिरात किंवा जागा मिळेल तीथे रात्र काढत होत्या. त्यांची साधी विचारपुसही यापुर्वी अकोला पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. मात्र हळव्या मनाचे असलेले पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या २०० वर महिला उमेदवारांची अडचण समजताच थेट पोलिस मुख्यालय गाठले. त्यांना राहण्याची व जेवनाची सुवीधा उपलब्ध करून दिली. यावरुन पोलिस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हळव्या मनाचा परिचीती उमेदवारांसह उपस्थित पोलिस अधीक्षकारी व कर्मचाºयांना आली.