रात्रीच्या संचारबंदीची पाेलीस अधीक्षकांकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:00+5:302020-12-24T04:18:00+5:30
अकाेला : काेराेनाचे संकट कायम असल्याने राज्यात ५ जानेवारी २०२० पर्यंत संचारबंदी लावण्यात आली असून, महापालिका क्षेत्रात रात्री ११ ...
अकाेला : काेराेनाचे संकट कायम असल्याने राज्यात ५ जानेवारी २०२० पर्यंत संचारबंदी लावण्यात आली असून, महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. त्यामुळे संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी रस्त्यावर उतरून संचारबंदीची पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाहणी केली. या दरम्यान एक पाेलीस अधिकारी हजर नसल्याने त्यांना पाेलीस अधीक्षकांसमाेर हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मार्च महिन्यानंतर राज्यात काेराेनाचे रुग्ण आढळताच कडक संचारबंदी लागू करण्यात आली हाेती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही संचारबंदी मागे घेण्यात आली; मात्र आता काेराेनाचे आणखी सावट येण्याची शक्यता असतानाच राज्यात महापालिका क्षेत्रात पुन्हा रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मंगळवारी शहरात संचारबंदी कशा प्रकारे सुरू आहे, याची पाहणी केली. या दरम्यान एक पाेलीस अधिकारी अनुपस्थित असल्याने संबंधित अधिकाऱ्यास हजर राहण्याचे सांगण्यात आले. यावेळी अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उप-अधीक्षक सचिन कदम यांच्यासह पाेलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले हाेते. शहराच्या प्रमुख चाैकात पाेलीस अधीक्षकांनी उपस्थित राहून सूचना केल्या, तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचारी यांना काहीही अडचणी आल्यास त्यांनी वरिष्ठांसाेबत संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. ५ जानेवारपर्यंत असलेली संचारबंदीचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले.