पोलीस अधीक्षक थेट साधणार फिर्यादींसोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 03:17 PM2020-07-07T15:17:51+5:302020-07-07T15:18:03+5:30

हा आगळा-वेगळा प्रयोग राज्यातील पहिलाच असल्याचे मानले जात आहे.

The Superintendent of Police will interact directly with the complainants | पोलीस अधीक्षक थेट साधणार फिर्यादींसोबत संवाद

पोलीस अधीक्षक थेट साधणार फिर्यादींसोबत संवाद

googlenewsNext

- सचिन राऊत 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देण्यासाठी येणाऱ्या फिर्यादींना टाळाटाळ करून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी बरेचदा समोर येत असल्याने आता फिर्यादींसोबतची पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची वागणूक तपासण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी फिर्याद देण्यासाठी आलेल्या प्रत्येकास फोन करून त्यांच्याकडून स्वत: माहिती घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हा आगळा-वेगळा प्रयोग राज्यातील पहिलाच असल्याचे मानले जात आहे.
जिल्ह्यातील प्रत्येकाच्या मनात पोलिसांविषयी असलेला गैरसमज दूर होऊन पोलीस तसेच जनता यांचे संबंध वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सकारात्मक पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आलेल्या फिर्याद दाखल करण्यास आलेल्या फिर्यादीासोबत त्याच दिवशी सायंकाळी ते संवाद साधत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येकाची बाजू जाणून घेऊन त्यांची तक्रार घेण्यासाठी पोलिसांना योग्य संवाद ठेवावा लागणार आहे. अन्यथा एखाद्या फिर्यादीस टाळाटाळ केल्यास किंवा त्याची तक्रार न घेतल्याची माहिती फिर्यादीने त्याच दिवशी सायंकाळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासोबत साधलेल्या संवादात दिली, तर या गैरकारभाराची चिरफाड पोलीस अधीक्षक स्वत: करणार आहेत. या प्रयोगामुळे आता ठाणेदार यांचा ताण वाढला असला तरी खाबुगिरी करणाºया पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरू झाली आहे.

सकारात्मक पाऊल
जी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारताच आधी पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना हेल्मेट सक्ती केली. पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट सक्ती आणि त्यांचा वापर सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येकाला हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.


नियंत्रण कक्षातून ठेवणार वॉच
पोलीस दलात पारदर्शकता यावी यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष येथून वॉच ठेवण्यात येणार असून, त्यासाठी चार प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. यानुसार तक्रारीची तत्काळ दखल घेतली का, एफआयआयरची प्रत देण्यात आली का, तक्रारीनुसारच तक्रार घेण्यात आली का, फिर्यादीस पोलीस स्टेशनमध्ये चांगली वागणूक मिळाली का? यानुसार दररोज घडलेल्या गुन्ह्यातील फिर्यादीची विचारपूस करून त्या माध्यमातून पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची पडताळणी करण्यात येणार आहे.

Web Title: The Superintendent of Police will interact directly with the complainants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.