सर्वोदय मंडळाचा सुतकताई करून शेतकरी आंदोलनास पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:42 PM2020-12-15T19:42:59+5:302020-12-15T19:45:09+5:30

Akola News कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनांनी सुरु केलेल्या आंदोलनास पाठींबा व्यक्त केला.

Support the farmers' movement by passing away Sarvodaya Mandal | सर्वोदय मंडळाचा सुतकताई करून शेतकरी आंदोलनास पाठिंबा

सर्वोदय मंडळाचा सुतकताई करून शेतकरी आंदोलनास पाठिंबा

Next
ठळक मुद्देया आंदोलनात जिल्हाभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.शेतकर्‍याच्या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्या अशी मागणी केली आहे.

अकोला: जिल्हा सर्वोदय मंडळाने मंगळवारी गांधी जवाहर बागेत चरख्यावर सूतकताई करुन कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनांनी सुरु केलेल्या आंदोलनास पाठींबा व्यक्त केला. या आंदोलनात जिल्हाभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते महादेवराव भुईभार,वसंतराव केदार,सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड,सचिव डाॅ.मिलींद निवाणे,किशोरकुमार मिश्रा,अनिल मावळे,पुंडलीक गवई,सर्व सेवा संघ प्रतिनिधी गुरुचरणसिंह ठाकुर,आकाश इंगळे,वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष गोवर्धनदादा खवले,दामोदर भटकर,रियाज खाँ शब्बीर खाँ,अंबादास केशवराव वसु,कापुस ते कापड वस्त्रस्वावलंबन अभियानाचे प्रमुख प्रल्हादराव नेमाडे यांनी चरख्यावर सूतकताई करुन किसान आंदोलनाला सक्रीय पाठींबा दिला. अन्नदाता शेतकर्‍याच्या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्या अशी मागणी अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाने केली आहे.

Web Title: Support the farmers' movement by passing away Sarvodaya Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.