एमआयडीसीतील बनावट पाइप, टाकी बनविण्याचे सुप्रीम काम

By नितिन गव्हाळे | Published: October 5, 2023 07:17 PM2023-10-05T19:17:19+5:302023-10-05T19:17:35+5:30

एमआयडीसी पोलिसांचा छापा: ४ लाखांचे बनावट पाइप, टाकी जप्त

Supreme job of fabrication of pipe, tank in MIDC | एमआयडीसीतील बनावट पाइप, टाकी बनविण्याचे सुप्रीम काम

एमआयडीसीतील बनावट पाइप, टाकी बनविण्याचे सुप्रीम काम

googlenewsNext

अकोला : सुप्रीम कंपनीच्या नावाखाली अकोल्यातील एमआयडीसीत बनावट पाइप, पाण्याची टाकी बनविण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू होता. याबाबत मुंबईच्या सुप्रीम कंपनीच्या संचालकांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसीत बुधवारी छापा घातला असता, सुप्रीम कंपनीसारखेच हुबेहूब बनविलेले पाइप, पाण्याच्या टाक्या आढळून आल्या.

पोलिसांनी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन प्रतिष्ठानांच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुप्रीम इंडस्ट्रिज लि. चे अधिकृत प्रतिनिधी श्रीहर शिवशरण त्रिपाठी (रा. गाजियाबाद) यांच्या तक्रारीनुसार त्यांची कंपनी प्लास्टिक पीव्हीसी पाइप व पाण्याच्या टाकीचे उत्पादन करते. कंपनीचे उत्पादन भारतभर विकले जाते. ३ ऑक्टोबर रोजी त्यांना अकोल्यातील एमआयडीसी क्रमांक ३ मध्ये असलेल्या हिना ट्रेडर्सचे मालक हितेश सुरेशकुमार वखारीया व संकेत वखारीया हे सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे डुप्लिकेट पीव्हीसी पाइपची निर्मिती करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याने, आमच्या कंपनीची बदनामी व आर्थिक नुकसान झाले आहे.

तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांनी हिना ट्रेडर्स येथे छापा घालून सुप्रीम कंपनीचे विविध प्रकारचे बनावट पाइपचे १२ बंडल (एकूण ५४१ पाइप) जप्त केले आहेत. या बनावट पाइपची एकूण किंमत १ लाख ६२ हजार ३०० रुपये आहे. यासोबतच श्रीराम हार्डवेअर कुंभारी रोड शिवर येथील गौरव बुब, गोपाल बुब यांच्याकडेही पोलिसांनी छापा घालून सुप्रीम कंपनीचे बनावट सीपीव्हीसी पाइप आढळून आले. त्याची किंमत ३९ हजार रुपये आहे. तसेच, एमआयडीसी क्रमांक ३ मधील साईधाम प्लास्टिक फॅक्टरीचे राजकुमार लठोरिया यांच्याकडेही छापा घालून सुप्रीम कंपनीच्या बनावट ५०० व १००० लिटर पाण्याची क्षमता असलेल्या प्रत्येकी १४ अशा २८ पाण्याच्या टाकी आढळून आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी राम चव्हाण करीत आहेत.

या कलमांनुसार पाच व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
सुप्रीम कंपनीच्या नावाखाली बनावट पाइप, पाण्याच्या टाक्यांची निर्मिती करून त्याची बाजारपेठेत विक्री केल्या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी हितेश सुरेशकुमार वखारीया व संकेत वखारीया, गौरव बुब, गोपाल बुब व राजकुमार लठोरिया यांच्याविरूद्ध ट्रेडमार्क अधिनियम १९९९ कलम १०२,१०३,१०४ कॉपीराइट अधिनियम १९५७ कलम ६३, ६५, आरआयपीसी कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार एमआयडीसीच्या पोलिस निरीक्षक वैशाली मुळे, एपीआय किशोर वानखेडे, दयाराम राठोड, सुनील टाकसाळे, राम काळे, एएसआय मुळतकर यांनी केली.

Web Title: Supreme job of fabrication of pipe, tank in MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला