सूरत-अमरावती सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी शुक्रवारपासून धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:01 AM2021-02-22T11:01:05+5:302021-02-22T11:01:13+5:30
Surat-Amravati superfast special train मध्य रेल्वेने सूरत-अमरावती सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी येत्या शुक्रवारपासून आठवड्यातून दोन वेळा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोला : गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने सूरत-अमरावती सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी येत्या शुक्रवार (दि. २६)पासून आठवड्यातून दोन वेळा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. ०९१२५ (सुरत-अमरावती) ही विशेष गाडी २६ फेब्रुवारीपासून दर शुक्रवारी व रविवारी दुपारी १२.२० वाजता सुरत येथून रवाना होऊन रात्री ८.२० वाजता अकोला स्थानकावर येईल व १०.२२ वाजता अमरावती येथे पोहोचणार आहे.
गाडी क्र. ०९१२६ (अमरावती-सुरत) ही विशेष गाडी २७ फेब्रुवारीपासून दर शनिवारी व सोमवारी अमरावती येथून सकाळी ०९.०५ वाजता रवाना होऊन सकाळी १०.३६ वाजता अकोला स्थानकावर येईल. येथून रवाना झाल्यानंतर शेगाव, नांदुरा, मलकापूर व भुसावळमार्गे सुरत येथे सायंकाळी ०७.०५ वाजता पोहोचणार आहे. ही गाडी पूर्णपणे आरक्षित असून, केवळ आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येणार आहे.
हापा-बिलासपूर साप्ताहिक गाडी शनिवारपासून
मध्ये रेल्ोने हापा-बिलासपूर ही विशेष गाडी येत्या शनिवार (दि. २७) पासून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र. ०९२३९ (हापा-बिलासपूर) ही विशेष गाडी शनिवार २७ फेब्रुवारीपासून दर शनिवारी हापा येथून रात्री ०९.५५ वाजता रवाना होऊन तिसऱ्या दिवशी बिलासपूर येथे पहाटे तीन वाजता पोहचणार आहे. ही गाडी अकोला येथे रविवारी दुपारी ०४.०५ वाजता येणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०९२४० ही विशेष गाडी १ मार्चपासून दर सोमवारी सकाळी १०.४५ वाजता बिलासपूर येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी ०३.३० वाजता हापा येथे पोहोचेल. ही गाडी रात्री ९.४२ वाजता अकोला स्थानकावर येईल. ही गाडी पूर्णपणे आरक्षित असून, केवळ आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येणार आहे.