सुरेकांची इमारत जमीनदोस्त

By admin | Published: May 17, 2014 12:20 AM2014-05-17T00:20:17+5:302014-05-17T00:20:28+5:30

शुक्रवारी रामनगरस्थित तोष्णीवाल लेआऊटमधील मनोज सुरेका यांची अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात आली

Surrek building flattened | सुरेकांची इमारत जमीनदोस्त

सुरेकांची इमारत जमीनदोस्त

Next

अकोला : वारंवार नोटीस व सूचना देऊनही मनपाच्या पत्रांना केराची टोपली दाखवणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी चांगलाच हिसका दाखवला. शुक्रवारी रामनगरस्थित तोष्णीवाल लेआऊटमधील मनोज सुरेका यांची अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात आली तर अशोक वाटिकानजिकच्या किशोर बाछुका यांच्या ह्यगणपती प्लाझाह्ण कॉम्प्लेक्सवरही हल्लाबोल केला. प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. बांधकाम करताना महापालिकेच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करणे बांधकाम व्यावसायिकांच्या अंगलट आले आहे. नियमापेक्षा जास्त बांधकाम असलेल्या; परंतु कुटुंब राहत असणार्‍या इमारतींना अभय देत, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी निर्माणधिन इमारतींना ह्यलक्ष्यह्ण केल्याचे दिसत आहे. त्यामधूनच आयुक्तांनी इमारत बांधकाम करणार्‍या व्यावसायिकांना नोटीस जारी करीत, बांधकाम थांबवण्याची सूचना केली होती. आयुक्तांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून अनेकांनी बांधकाम सुरू ठेवल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. यातही काही इमारतींचा नकाशा मंजूर नसतानासुद्धा इमारत उभारली जात असल्याचे समोर आले. यामध्ये प्रामुख्याने रामनगरस्थित तोष्णीवाल लेआऊटमधील मनोज कृष्णकुमार सुरेका यांच्या इमारतीचा समावेश आहे. सुरेका यांच्याकडे सदर इमारत बांधण्यासाठी नगर रचना विभागाची परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या मुद्यावर ६ मे रोजी मनपा अधिकार्‍यांनी सुरेका यांना समज दिल्यावर सुरेका यांनी बांधकाम नियमानुसार करणार असल्याचे शपथपत्र लिहून दिले होते. त्यानंतरही बांधकाम सुरूच ठेवल्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण इमारत धाराशायी करण्याची कारवाई शुक्रवारी करण्यात आली. याप्रमाणेच अशोक वाटिकानजिक किशोर बाछुका यांचे ह्यगणपती प्लाझाह्णकॉम्प्लेक्सवरही अतिक्रमण विभागाने कारवाई केली. संकुलाचा काही भाग पाडल्यानंतर कारवाईला अडथळा निर्माण करण्यात आला. त्यामुळे हे बांधकाम पुर्णपणे धराशायी करता आले नाही. दरम्यान यापुढे देखील मनपा आपली कारवाई पुढे चालूच ठेवणार आहे.

Web Title: Surrek building flattened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.