मनपाच्या वैद्यकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:58 AM2021-01-08T04:58:36+5:302021-01-08T04:58:36+5:30

रतनलाल चाैकातील नाला तुंबला अकाेला: रतनलाल प्लाॅट चाैकातील मुख्य नाल्यांची मागील महिनाभरापासून साफसफाई झाली नसल्यामुळे परिसरातील माेठे नाले व ...

Survey from the medical system of the corporation | मनपाच्या वैद्यकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण

मनपाच्या वैद्यकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण

Next

रतनलाल चाैकातील नाला तुंबला

अकाेला: रतनलाल प्लाॅट चाैकातील मुख्य नाल्यांची मागील महिनाभरापासून साफसफाई झाली नसल्यामुळे परिसरातील माेठे नाले व नाल्या तुंबल्याचे चित्र समाेर आले आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या भागातील नगरसेवक, मनपाचे आराेग्य निरीक्षक फिरकत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

उपहारगृहांसमाेर वाहने;वाहतुकीला अडथळा

अकाेला: मुख्य पाेस्ट ऑफिस ते सिव्हिल लाईन चाैक, रेल्वे स्टेशन चाैक, जठारपेठ चाैक ते रतनलाल प्लाॅट चाैक आदी मुख्य रस्त्यांवर असलेल्या उपहारगृहांसमाेर खवैय्यांची चांगलीच गर्दी हाेत असून त्यांच्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा हाेत आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी हाेत आहे.

सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट

अकाेला: शहराच्या विविध भागात माेठा गाजावाजा करून सिमेंट रस्त्यांचे निर्माण केले जात आहे. यातील बहुतांश कामे अर्धवट स्थितीत असून यामुळे वाहनधारकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने टिळक राेड ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दुर्गा चाैक, पंचायत समिती राेड, खाेलेश्वर मार्ग आदी रस्ते आहेत.

जलवाहिनीसाठी खाेदले रस्ते

अकाेला : शहराच्या विविध भागात जलवाहिनीचे नवीन जाळे टाकले जात आहे. खाेदकामादरम्यान मुख्य रस्त्यांसह प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांची ताेडफाेड हाेत आहे. जाळे टाकल्यानंतर कंत्राटदाराने रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असताना दुरुस्तीकडे पाठ फिरवण्यात आल्यामुळे अकाेलेकरांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

तुरीवर प्रादुर्भाव; शेतकरी हतबल

अकाेला: यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना साेयाबीन, मूग,उडीद, ज्वारी आदी पिकांचे नुकसान सहन करावे लागले. हे आर्थिक नुकसान तुरीच्या उत्पादनामुळे भरून निघेल अशी अपेक्षा असताना ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी हतबल ठरत आहे.

उघड्यांवर खुलेआम मांस विक्री

अकाेला: महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराच्या विविध भागात थेट रस्त्यालगत उघड्यावर मांस विक्री केली जात आहे. आराेग्य विभागाच्या निकषानुसार मांस विक्रेत्यांना उघड्यावर व्यवसाय करता येत नाही. याप्रकरणी मनपाच्या आराेग्य व अतिक्रमण विभागाने धडक कारवाई राबविण्याची मागणी हाेत आहे.

जठारपेठ चाैकात वाहतुकीची काेंडी

अकाेला : शहरात वर्दळीच्या असलेल्या जठारपेठ चाैकात भाजी व फळ व्यावसायिकांनी चक्क रस्त्यावरच बाजार थाटला आहे. यामुळे चाैकात वाहतुकीची चांगलीच काेंडी हाेत असून सर्वसामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. प्रभागातील नगरसेवक व मनपाला कर्तव्याचा विसर पडल्याने नागरिकांमध्ये राेष आहे.

शहरात साफसफाईचा फज्जा

अकाेला: मनपा आयुक्त संजय कापडणीस यांचे स्वच्छता व आराेग्य विभागाकडे दुर्लक्ष हाेत असून चारही क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून सफाई कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भाेगावे लागत आहेत. शहरात साफसफाईचा फज्जा उडाला असून नाल्या,गटारे, मुख्य रस्त्यांलगत तसेच प्रभागांमध्ये घाण साचली आहे.

Web Title: Survey from the medical system of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.